स्व. बबनरावजी काळे साहेब

  • मुख्य
  • मुख्य

सन २०१० -११ ऊसाच्या आंदोलनपूर्वी कार्यकर्ते समवेत आंदोलनाचे नियोजन करताना.

नव्याने शेतकरी संघटनेट प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यास स्वतः बिल्ला लावून प्रोत्साहित करताना

येवला येथील एंझो केम हायस्कूल मद्दे विद्यार्थांना व्यवसाय मार्गदर्शन करताना ४ /१० /१९८८

स्व. बबनराव मुक्ताजी काळे

गावोगावी बैठका घेवून शेतकरी संघटनेची बांधनी करताना

SMP कायदा रद्द करण्यास विरोध दर्शविणारे आंदोलन प्रसंगी सरकारच्या नविन वट हुकुमची होळी करताना २१ /११ /२००९

सी डी जे कॉलेज च्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबिरात प्रमुख पाहुने म्हणून उपस्तिथी १९९८ -९९

काळे साहेबांच्या सौभाग्यवतीच्या हस्ते शेतकरी संघटनेच्या मा प्र अध्यक्ष सौ. यांचा सत्कार

राहाता येथील शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करताना ०९ /०८ /२००९

शेतकरी संघटनेच्या जिल्हा बैठकीत मार्गदर्शन करताना १५ /०६ /२००८

श्रीरामपुर येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी

राहाता येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना

शेतकरी संघटनेच्या मा. अध्यक्ष भास्करभाऊ बोरवके यांच्याकडून सत्कार स्वीकारताना

श्रीरामपुर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना १३ /०९ /२००१

राहता येथील २००९ शेतकरी परिषदेस सम्बोधित करताना

राहता येथील २००९ शेतकरी परिषदेस मार्गदर्शन करताना ०९ /०८ /२००९

मंत्रांच्या वादग्रस्त विधानांच्या निषेद सभेत बोलताना

श्री. बबनराव काळे स्वागत पद बोलताना , पूर्वी कडून श्री. ईएद जाहेली , सदाभाउ खाडे , युवा अध्यक्ष लक्षणराव वडले , अद्यक्ष शेतकरी संघटना , मा. आमदार श्री. वामनराव यटाप , श्री. अनिल धनवटे

श्री. बबनराव काळे स्वागत मनोगत श्री. रघुनाथ दादा पाटील ( सांगली ) श्री. भास्करभाऊ बोरावके , कोपरगाव सौ. डॉ. निर्मलताई जगताप (येवला )

जेष्ठ साहित्यिक व वक्ते श्री वानखेड़े चंद्रकांत यांचा सत्कार करताना

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११

जिल्ह्यात सर्वत जास्त भाव देणाऱ्या को. सा. का. चे अध्यक्ष मा. आ. अशोक काळे यांच्या सत्कार सभारम्भात प्रमुख पाहुने म्हणून उपस्थिति दरम्यान सत्कार स्वीकरताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे दीप प्रज्वलन करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ सत्कार करताना

स्मरणिका २०११ चे प्रकाशन करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे मनोगत करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे मनोगत करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे मनोगत करताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे मनोगत करताना

आंदोलन बैठक , करेगाव

कार्यकर्त्यासमवेत शेतकरी संघटनेच्या बैठकीत

कर्जमुक्तीच्या आंदोलनात महत्वाचा सहभाग नोंदवताना

राज्यकार्यकरणी बैठकात व स्मरणिका प्रकाशन समारंभ ११ /०६ /२०११ चे मनोगत करताना

कर्जमुक्तीच्या आंदोलनात महत्वाचा सहभाग नोंदवताना

खंडकारी शेतकऱ्यांना माळवाडगाव येथील सभेत मार्गदर्शन करताना

उपस्थित शेतकरी वर्ग

भरनियमनाच्या विरोधात मोर्चाचे नेतृत्व करताना

शेतकरी परिषदेत २००९ मदे कार्यालयीन चर्चा करताना श्री. बबनराव काळे

खंडकारी शेतकऱ्यांना माळवाडगाव येथील सभेत मार्गदर्शन करताना

खंडाला येथे शेतकरी बैठकीत सत्कार स्वीकारताना

नांदुर ता. राहता येथे आयोजित उस दराचे आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना

राहुरी तालुक्यात आयोजित मेळाव्यात काळे साहेबांचा सत्कार करताना प्रशांत कराळे

नांदुर ता. राहता येथे आयोजित उस दराचे आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांना संघटनेची भूमिका समजाविताना

राहुरी येथे कराळे मळा येथे महिला आघाडीच्या नेता व इतर कार्यकर्त्या समवेत

छत्रपती शाहू महाराज राज्य स्तरीय 'आदर्श संघटन ' हा पुरस्कार मिळाले बद्दल नांदुर ता. राहता येथे आयोजित सत्कार समारंभ यात उत्तर देताना

महाराष्ट्र भूषण राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०१० चा 'आदर्श संघटन ' हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वाकडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार सभारंभात सपत्नीस उपस्थिती

श्री. काळे ,शिंदे . नावूर श्री. कोठारी साहेब मौजे नांदूर येथे सत्कार स्वीकारताना

लोणी येथे कार्यकर्त्या समवेत

कार्यकर्त्या समवेत

कार्यकर्त्या समवेत महत्वाची भूमिका मांडताना

महाराष्ट्र भूषण राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०१० चा 'आदर्श संघटन ' हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वाकडी ग्राम्स्तांनी आयोजित केलेल्या सत्कार सभारंभात सत्कार स्वीकारताना

कार्यकर्त्या समवेत महत्वाची भूमिका मांडताना

कारखान्यावर बोलणी करण्याकरता जातानाचा प्रसंग

राहुरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात संबोधन करताना

राहुरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात संबोधन करताना

कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना

श्रीरामपूर येथे आयोजित स्मरणिका प्रकाशन करताना

कार्यकर्त्यां व नेत्यांसमवेत राहता

श्रीरामपूर येथे आयोजित स्मरणिका प्रकाशनाच्या उदघाटन सोहळा दरम्यान

जानकी पुरस्कार स्वीकारताना

जानकी पुरस्कार स्वीकारताना

जानकी पुरस्कार सभारंभात उत्तर देताना

शेताकार्यांसमावेत व्यासपिठाऐवजी खाली बसून सभेत सहभाग देताना

कार्यकर्त्यांना संबोधित करताना

कार्यकर्त्यांना संबोधित करताना

संघटनेचे रुपेंद्र काले यांचा सन्मान करताना

कांदा आंदोलन २०/९/०६

कांदा आंदोलन २०/९/०६

आंदोलनापूर्वी कार्याकार्यांना संघटनेची भूमिका समजून सांगताना

मु.प्र.मौर्चा श्री . देवकर उप कार्यकारी अभियंता

कर्ज मुक्ती बैठक आगाशे सभागृह श्रीरामपूर अँड अनंतराव , परभणी यांचा सत्कार करताना बबनराव काळे

शेतकरी संघटनेचा मोर्चा स चालतानाचा प्रसंग

बबनराव काळे साहेब यांचा परिवार

शेतकरी संघटनेचा मोर्चा स चालतानाचा प्रसंग २३/०५/२०११

कोळगाव येथे शेतकरी युवा आघाडी शाखा उद्घाटन प्रसंगी बबनराव काळे साहेब , सदाभाऊ खोत , अनिल धनवटे , भाऊसाहेब गायकवाड ,निवृत्ती पा गोरे , दामोदर गवळी ,भाऊसाहेब तासकर , साडू भाई शेख . आदि

पद्यभूषण अण्णा हजारेनां ठेवी दारांच्या संबधी भेट श्रीरामपूर पिपल्स बँक

महाराष्ट्राचे राज्यपाल एस.सी. जमीर यांना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत निवेदन देताना

शेतकरी संघटनेचे पंचप्राण कै. शरद जोशी यांच्या समवेत चर्चा करताना . दि. १५/०५/२००२

शेतकरी परिषद २००९ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मा. बबनराव काळे

भारतीय क्रिकेट संघाचे मा. कर्णधार अजित वाडेकर यांचा सत्कार करतांना

शेतकरी संघटनेचे पंचप्राण कै. शरद जोशी यांच्या समवेत चर्चा करताना . दि. १५/०५/२००२

मा. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची शेतमालाच्या आधारभूत किमती व निर्यात निर्बंध उठविणे बाबत घेतलेली भेट …

शेतकरी परिषद २००९ मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मा. बबनराव काळे

शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न सोडविण्यात प्रयत्न शील

कांदा आंदोलनात सक्रिय सहभाग

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठीच्या आंदोलनात मार्गदर्शन करताना

शेतकरी संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना

कॉलेज मधील विद्यार्थांना मार्गदर्शन करताना

शेतकऱ्यांचे प्रश्न अविरत पणे व प्रामाणिकपणे सोडविण्याची शपथ घेताना

कार्यकर्ता बैठकीत आपले मत मांडताना

वर्धमान पात संस्थेचे संस्थापक चेअरमन राजेंद्र काळे सत्कार करतांना

पद्मभूषण मा. श्री. अण्णा हजारे यांची श्रीरामपूर पीपल्स बँकेच्या ठेवीदारांच्या मागणीसाठी भेट

स्व. बबनराव काळे यांच्या बद्दल

पूर्ण नाव : श्री. बबनराव मुक्ताजी काळे


पत्ता : "झुंज " सूर्यनगर, वा. नं. ७, श्रीरामपुर-४१३७०९ जिल्हा - अहमदनगर शिक्षण : एस.एस.सी ( जुनी अकरावी ) १९६२-६३ विशेष प्राविन्यासह ( स्पेशल डिस्टिंशन ) उत्तीर्ण प्राथमिक शिक्षण : जिल्हापरिषद (लोकल बोर्ड ) शाळा कसारा, ता. शहापुर, जिल्हा - ठाणे माध्यमिक शिक्षण : महात्मा गांधी विद्यालय , इगतपुरी जिल्हा - नाशिक महाविद्यालयीन शिक्षण : इंटर पर्यंत ( पुढील शिक्षण वडील स्वर्गवासी झाल्याने पूर्ण झाले नाही ) तांत्रिक शिक्षण :- इंग्रजी टायपिंग व शोर्टहांड कोर्से कल्याण , जिल्हा - ठाणे हिंदी राष्ट्रभाषा दोन परीक्षा उतीर्ण संस्कृत शिक्षण तीन वर्ग उतीर्ण

नोकरी संदर्भात : प्रथम दीड वर्ष डॉ. आर. व्ही. पारकर यांच्या कसारा येथील डीस्पेन्सारीत कंपाउंडर चे काम केले . नंतर उल्हासनगर येथे आय. टी . आय मध्ये एक महिना राज्य शासनाची टायपिस्ट म्हणून नोकरी केली त्या नंतर दि. १ मार्च १९६६ पर्यंत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या मोहता फलटण रोड , मुंबई (खाद्य मंत्रालय ) येथे नोकरी केली . दि. १ मार्च १९६६ पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्य कार्यालयात क्लार्क म्हणून रुजू झाले. दि. २२/०५/१९६६ रोजी वडील कै. मुक्ताजी विठोबा काळे हे अचानक स्वर्गवासी झाल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी म्हणजे आई, दोन भाऊ, दोन बहिणी व एक विवाहित बहिण , तिच्या दोन मुली अशा कुटुंबास मुंबईत न परवडणारे होते मुंबई हून बदली मागितली व श्रीरामपूर येथे दि. १/०८१९६७ साली हजर झाले . मुंबई शहरात शिक्षण व वात्सव्य असल्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते त्यांच्या आधारे व बँकेतील कामकाजात सखोल काम केल्यामुळे बँकेच्या बढतीच्या स्पर्धा परीक्षा प्राविण्यासह उतीर्ण होऊन लवकरच अधिकारी होण्याची संधी मिळाली. शेवटी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक म्हणून वेगवेगळ्या शाखेत काम केले व कार्माचार्यावरील अन्यायाला वाचा फोडली . दि. ३१/०३/२००१ रोजी ५ वर्षे नोकरी असतानाही सामाजिक कामाच्या ओढीमुळे व आवडीमुळे स्वेच्छा निवृत्ती घेतली . कोटुंबिक माहिती : पत्नी सौ. विजया , दोन मुले पैकी एक अजित व दुसरा अभिजीत असून दोघेही विधी शाखेतील पदाविधार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रक्टिस करीत आहेत . सामाजिक पदभार : १. महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष २. महाराष्ट्र शासन गठीत ऊस दर समितीवर सदस्य ३. महाराष्ट्र शासन शेतीमाल नियंत्रण उपसमितीवर सदस्य ४. कोशाद्याक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य, शेतकरी संघटना ५. अहमदनगर जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी बँकिंग समिती, शेतकरी संघटना १. पुरस्कार व सन्मान : स्व. बँ. रामरावजी अदीक व स्व. गोविंदरावजी अदीक यांच्या आईच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार ' जानकी पुरस्कार २०११' २. महाराष्ट्र भूषण राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय 'आदर्श संघटक ' पुरस्कार २०११ ३. कॉलेज मध्ये विद्यार्थांना मेळाव्यात मार्गदर्शन केल्याबद्दल श्रीरामपूर, मुंबई -पुणे येथील सन्मानित करण्यात आले ४. कनफ़दरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रि ' आयोजित मुंबई येथील अग्रोविजन २०२० मध्ये आलेल्या चर्चासत्रात भाग घेऊन शेतकऱ्यांची योग्य अशी बाजू मोठमोठ्या उद्योग्पातींसमोर मांडून ठेवल्याने त्यांच्या सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. ५. 'ग्लोबल अग्रो फौंडेशन ' व ' पुणे जिल्हा संपादक ग्रुप ' तर्फे दि. १९/०९/२०११ रोजी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले होते. ६. काळे साहेबांच्या शेतकऱ्याविषयी अभ्यासाची दाखल घेऊन महाविद्यालयात व वेगवेगळ्या व्यासपीठावरून दिलेल्या व्याख्यानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याचा अनुभव : सन १९८० साली मा. शरद जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या झंजावात आला त्यावेळी शरद जोशींनी प्रथम उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या एक कलमी परंतु अत्यंत प्रभावी व कोणीही आजपर्यंत न मांडलेला सिद्धान्त शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलू शकतो या खात्रीने शेतकरी संघटनेत भूमिगत कार्यकर्त्यांच्या भूमिकेत काम करू लागले. कारण नोकरीत असल्यामुळे प्रत्यक्ष काम करता येत नवते , सन १९८० ते २००१ पर्यंत अनेक अधिवेशने , मेळावे कार्यकारणी बैठकात उपस्थित राहिले, सन १९८९ साली पहिल्या कर्जमुक्तीसाठी मा. भास्करराव बोरवके माजी राज्य अध्यक्ष यांचे सोबत शेतकऱ्यांचे नादारीचे अर्ज भारावून अहमदनगर कोर्टात दाखल केले , त्यावेळी शेतकऱ्यांना १०००० रु. कर्जमाफी झाली होती . ३१/०३/२००१ रोजी स्वेच्छा निवृत्ती घेऊन दि. १ एप्रिल २००१ पासून शेतकरी संघटनेच पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सक्रिय झाले होते. दि. ३१ मे २००१रोजी येवला येथे सभेत आ. वामनराव चपट अध्यक्ष, शेतकरी संघटना व मा. रघुनाथ दादा पाटील, अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवृत्ती झाली. त्यानंतर संघटनेच्या वेगवेगळ्या पुकारलेल्या सर्व आंदोलनात महाराष्ट्र सर्वत्र सक्रिय सहभाग दिला . महाराष्ट्रातच नाहीतर संघटनेच्य पानिपत ( हरियाना ) या आंदोलनात , दिल्ली येथे , गुजरात येथे नर्मदा परिक्रमा अशा सर्व आंदोलनात सहभाग नोंदविला . त्यांचे काम पाहून जोशी साहेबांनी त्यांची निवड कोषाध्यक्ष व राज्य कार्यकारणीचे सदस्यपदी केली होती तसेच कर्जमुक्तीच्या आंदोलनात पूर्ण काम केल्याने त्यांची निवड मा. शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्र राज्य कृषी बँकिंग धोरण समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली . स्व. काळे साहेबांच्या उसावरील अभ्यासाचा विचार करून स्व. काळे साहेबांची महारष्ट्र राज्याची उस दर निश्चिती समितीवर राज्य पालांच्या सहीने निवृत्तीन करण्यात आली . पुढे रघुनाथ दादा यांच्या समवेत काम करताना ते त्यांचे अंतिम समय पर्यंत राज्याचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून संघटनेचे काम पहिले , कर्जमुक्तीची धोरण झाल्यानंतर सन २००८ शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले , त्यासाठी रिझर्व बँक, नाबार्ड , सहकार आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन गावगावी प्रचार केला . विजेसंबंधी कायद्याच अभ्यास करून ट्रान्सफार्म जाळीत प्रकरण व फार्म कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना एक महिन्यात कनेक्शन मिळण्यात पर्यंत केले.

साखर कारखान्याचे संबंधी उस उत्पादनासठी मेळावे घेऊन ऊसाच्या दरासंबंधी प्रबोधन केले , यासाठी साखर आयुक्त कृषी मंत्री व कृषिमूल्य व किंमत आयोगासोबत मुंबई येथे मा. रघुनाथ दादा पाटील यांचे सोबत बैठकीत उत्पादन खर्चाचे आकडे कसे चुकीचे काढले जातात हे पुराव्यासह आयोग्गाच्या अध्यक्षांना दाखवून दिले . त्याचाच परिणाम म्हणून अयोगाचे अध्यक्ष डॉ. टी हक यांनी दि. २७ मार्च २००८ रोजी पुरवणी अहवाल देऊन उसाची एम. आर. पी १५५० रु, प्रतिटन शिफारस केली . व शेतमालाच्या किमती ३५% वाढविण्यात आल्या . कृषीकिमत व आयोगाने दिल्लीत दि. ५/६/ ऑगस्ट २००८ रोजी झालेल्या बैठकीत आमंत्रण केले . तेथेही हा प्रश्न पोटतिडकीने मांडला . दि. १७/०२/२०१० रोजी पुन्हा दिल्लीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी सोबत बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते . तसेच ऊसाच्या प्रश्नसंबंधी राज्याचे राज्यपाल मा. एस.पी . जमीरसाहेब यांचेकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकारेसाहेब यांच्या सोबत चर्चा केलि. तसेच दि. १९/०२/२००९ रोजी मा. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी कऱ्हाड येथे आमंत्रित करून त्यांच्याशीही ऊसाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत निवेदन दिले. बाजार समितीतील गैर्व्यावाहारासंबंधी पणन संचालक यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष्य वेधले . शेतमाल भावासामितीच्या पिक उत्पादन खर्चाची आकडेवारी कशी चुकीची आहे त्यामुळे खरी किंमत निघत नाही . व परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो म्हणून अनेक वर्षे कृषी मंत्रालयातील समिती कक्षाकडे पत्राव्याहार बैठकात घेऊन चर्चा केली .

कांदा उस आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीची बाजार समितीत होणारी लूट , वजनातील कसर म्हणून कपात करण्यात येणारी २ किलो कापती विरुध्द अनेक पत्र व्यवहार व प्रत्यक्ष आंदोलन केले. उस कांदा आंदोलनातील स्तानिक कोर्टात त्यांचे विरीधात अनेक केसी दाखल झाल्या होत्या , कांदा आंदोलनाचे रस्ता रोकोबद्दल श्रीरामपूर न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता . त्यात श्री काळे साहेबांसामावेत इतर ९ सहकार्यांना १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देखील झाली होती , बाजार समितीतील हमालीवर लेव्ही शेतकऱ्यांच्या शासनाच्या परिपत्रकाला कचरु कुऱ्हे व तुकाराम कुऱ्हे यांना पुढे करून ( बँकेत नोकरीस असल्यामुळे )औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्र . १३४०/१९२२ नुसार स्थगिती घेण्यात आली . व पुढे दि. १ जुलै २००५ ला अंतिम निकाल लागून शेतकऱ्यांच्या या जुलमी वसुलीपासून मुक्तता करण्यात यशस्वी झाले . पाटपाणी संघर्षाबाबत ( भंडारदरा ) क्षेत्रातील गोदावरी ऊजव्या कालव्याच्या ७ नंबर वरील फ़ोर्मवर पाण्यासाठी आंदोलन केले , त्यातही राहता येथील ९/४/२०१० रोजी केलेल्या साडेचार तास रस्ता रोको केल्याबद्दल केसेस दाखल झाल्या होत्या . तसेच मा. काळे साहेबांच्या कार्याची व शेतीविषयक अभ्यासाची दाखल घेत केंद्रशासनाने अखत्यारीत असलेल्या कृषिमूल्य आयोगामध्ये सदस्य म्हणून घेनेकारिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांची शासनाची वतीने शिफारस केली परंतु पुढे त्यांची नियुक्ती होणे पूर्वीच त्यांचा अपघात झाल्याने त्यांची नियुक्ती मागे पडली , तसेच स्व. काळे साहेबांची महाराष्ट्र शासन शेतीमाल नियंत्रण उपसमितीवर सदस्यपदी निवड झाली होती . त्याप्रमाणे या समितीच्या वेळोवेळी कृषीविद्यापीठामध्ये झालेल्या सर्व बैठकात उपस्थित राहून शेती मालाचा भाव काढण्याच्या प्रक्रियेत दोष दाखविल्याचा व त्यावर उपाय योजना सुचविल्या होत्या . अशा प्रकारे सातत्याने शेतकऱ्यासंबंधी परतेक प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने, सभा , घेराव आदि कामे केली आहेत . शेतकरी संघटनेचं प्रश्नावर जागृती व्हावी यासाठी सर्व स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्र करिता लेख लिहिले . बातम्या प्रसिद्ध करून लक्ष वेधत असत . त्यांचा शेतकरी चळवळीचा हा लढा सातत्याने दिवस रात्र सुरु होता व त्यांनी श्वास असे पर्यत चालू ठेवला .

श्रीरामपूर येथे २८/०४/२०१५ रोजी शरद पवार यांच्या होणार्या कार्यक्रमात निषेधाच्या आंदोलनाचे नियोजनाच्या कामात असताना दि. २७/०४/२०१२ रोजी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला . त्यानंतर त्यांचे बाहेर फिरणे बंद असताना देखील जागेवर बसून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे , लेख लिहिणे चालूच ठेवले अखेर दि . १५/०१/२०१५ रोजी त्यांना देवाज्ञा झाली .

मनोगत

" www.babanraojikale.org " हे संकेतस्थळ बबनरावजी काळे यांचे आयुष्यावर व त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. या संकेतस्थळ प्रकाशन यांच्या प्रथम स्मुती दिनाचे दिवशी करून त्यांना आदरांजली वाहने व त्याच्या विचारांची चळवळ सुरु राहावी हा उद्देश आहे . स्व. काळे साहेबांच्या आयुष्याचा प्रवास , त्यांचे खडतर आयुष्य , आयुष्यात पावलोपावली आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेली मात , साहेबांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेले लिखाण , कामे हि जशीच्या तशी काळे साहेबांच्याच शब्दात ठेऊन नवीन पिढीला प्रेरानादाई ठरेल व त्यांच्या कामाच्या व कामातून त्यांना मिळालेली माहिती सामाज्यापुढे विशेष करून शेतकरी वर्गापुढे ठेवण्याचा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे . या संकेतस्थळाच्या माद्यमातून स्व. बबनरावजी काळे साहेब यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा त्यांच्यासोबत आयुष्याची काही वर्षे व्यथित केलेल्या त्यांच्या मित्र परिवार , सहकारी नातेवैकांच्या अनुभवातून बोलण्यातून व लिखाणातून आलेला सर्व काही मांडणे आवश्यक होते व हे सर्व अनुभव संग्रही ठेवाही असे आहे व तशी जाणीव झाल्याने हा संकेतस्थळाची रचना केलेली आहे. या संकेतस्थळाचे संकालानाकरिता काळे साहेबांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केलेली वर्तमान पत्रातील लेख , सरकारी निम सरकारी कार्यालयांना वेळोवेळी लिहिलेलं पत्रे , विविध सामाजिक कार्यात घेतलेले सक्रिय सहभाग , विविध विषयांवर शाळा , कॉलेज इतर मंचावरून संमेलनातून केलेले व्याख्य्याने या सर्वाचे संकलन करणे लोकांसमोर ठेवेने आवश्यक होते. या संकेतस्थळावर शक्य होईल तितकी माहिती सूटसुटीत व सुलभतेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे

- अॅड. अभिजीत बबनराव काळे.
  • स्व. बबनराव काळे यांच्या बद्दल
  • मनोगत
Contact Us
Our Location

पत्ता.

स्व. बबनरावजी काळे
c/o -अॅड. अभिजीत बबनराव काळे
" झुंज " सूर्यनगर , वार्ड नं . ७, श्रीरामपूर ,
ता. श्रीरामपूर, जिल्हा - अहमदनगर
राज्य - महाराष्ट्र

  • मोबाईल. ९८२२४४९२८८
    ९३२६४४९२८८
  • Email: abhijitbkale@gmail.com