स्व. बबनरावजी काळे साहेब

  • मुख्य
  • मुख्य
image 1

image 2

image 3

image 4

image 5

image 6

image 7

image 8

image 9

image 10

image 11

image 12

image 13

image 14

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

image 15

स्व. बबनराव काळे यांच्या बद्दल

पूर्ण नाव : श्री. बबनराव मुक्ताजी काळे


पत्ता : "झुंज " सूर्यनगर, वा. नं. ७, श्रीरामपुर-४१३७०९ जिल्हा - अहमदनगर शिक्षण : एस.एस.सी ( जुनी अकरावी ) १९६२-६३ विशेष प्राविन्यासह ( स्पेशल डिस्टिंशन ) उत्तीर्ण प्राथमिक शिक्षण : जिल्हापरिषद (लोकल बोर्ड ) शाळा कसारा, ता. शहापुर, जिल्हा - ठाणे माध्यमिक शिक्षण : महात्मा गांधी विद्यालय , इगतपुरी जिल्हा - नाशिक महाविद्यालयीन शिक्षण : इंटर पर्यंत ( पुढील शिक्षण वडील स्वर्गवासी झाल्याने पूर्ण झाले नाही ) तांत्रिक शिक्षण :- इंग्रजी टायपिंग व शोर्टहांड कोर्से कल्याण , जिल्हा - ठाणे हिंदी राष्ट्रभाषा दोन परीक्षा उतीर्ण संस्कृत शिक्षण तीन वर्ग उतीर्ण

नोकरी संदर्भात : प्रथम दीड वर्ष डॉ. आर. व्ही. पारकर यांच्या कसारा येथील डीस्पेन्सारीत कंपाउंडर चे काम केले . नंतर उल्हासनगर येथे आय. टी . आय मध्ये एक महिना राज्य शासनाची टायपिस्ट म्हणून नोकरी केली त्या नंतर दि. १ मार्च १९६६ पर्यंत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या मोहता फलटण रोड , मुंबई (खाद्य मंत्रालय ) येथे नोकरी केली . दि. १ मार्च १९६६ पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्य कार्यालयात क्लार्क म्हणून रुजू झाले. दि. २२/०५/१९६६ रोजी वडील कै. मुक्ताजी विठोबा काळे हे अचानक स्वर्गवासी झाल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी म्हणजे आई, दोन भाऊ, दोन बहिणी व एक विवाहित बहिण , तिच्या दोन मुली अशा कुटुंबास मुंबईत न परवडणारे होते मुंबई हून बदली मागितली व श्रीरामपूर येथे दि. १/०८१९६७ साली हजर झाले . मुंबई शहरात शिक्षण व वात्सव्य असल्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते त्यांच्या आधारे व बँकेतील कामकाजात सखोल काम केल्यामुळे बँकेच्या बढतीच्या स्पर्धा परीक्षा प्राविण्यासह उतीर्ण होऊन लवकरच अधिकारी होण्याची संधी मिळाली. शेवटी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक म्हणून वेगवेगळ्या शाखेत काम केले व कार्माचार्यावरील अन्यायाला वाचा फोडली . दि. ३१/०३/२००१ रोजी ५ वर्षे नोकरी असतानाही सामाजिक कामाच्या ओढीमुळे व आवडीमुळे स्वेच्छा निवृत्ती घेतली . कोटुंबिक माहिती : पत्नी सौ. विजया , दोन मुले पैकी एक अजित व दुसरा अभिजीत असून दोघेही विधी शाखेतील पदाविधार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रक्टिस करीत आहेत . सामाजिक पदभार : १. महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष २. महाराष्ट्र शासन गठीत ऊस दर समितीवर सदस्य ३. महाराष्ट्र शासन शेतीमाल नियंत्रण उपसमितीवर सदस्य ४. कोशाद्याक्ष तथा राज्य कार्यकारणी सदस्य, शेतकरी संघटना ५. अहमदनगर जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी बँकिंग समिती, शेतकरी संघटना १. पुरस्कार व सन्मान : स्व. बँ. रामरावजी अदीक व स्व. गोविंदरावजी अदीक यांच्या आईच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार ' जानकी पुरस्कार २०११' २. महाराष्ट्र भूषण राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय 'आदर्श संघटक ' पुरस्कार २०११ ३. कॉलेज मध्ये विद्यार्थांना मेळाव्यात मार्गदर्शन केल्याबद्दल श्रीरामपूर, मुंबई -पुणे येथील सन्मानित करण्यात आले ४. कनफ़दरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रि ' आयोजित मुंबई येथील अग्रोविजन २०२० मध्ये आलेल्या चर्चासत्रात भाग घेऊन शेतकऱ्यांची योग्य अशी बाजू मोठमोठ्या उद्योग्पातींसमोर मांडून ठेवल्याने त्यांच्या सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. ५. 'ग्लोबल अग्रो फौंडेशन ' व ' पुणे जिल्हा संपादक ग्रुप ' तर्फे दि. १९/०९/२०११ रोजी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले होते. ६. काळे साहेबांच्या शेतकऱ्याविषयी अभ्यासाची दाखल घेऊन महाविद्यालयात व वेगवेगळ्या व्यासपीठावरून दिलेल्या व्याख्यानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कार्याचा अनुभव : सन १९८० साली मा. शरद जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या झंजावात आला त्यावेळी शरद जोशींनी प्रथम उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या एक कलमी परंतु अत्यंत प्रभावी व कोणीही आजपर्यंत न मांडलेला सिद्धान्त शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलू शकतो या खात्रीने शेतकरी संघटनेत भूमिगत कार्यकर्त्यांच्या भूमिकेत काम करू लागले. कारण नोकरीत असल्यामुळे प्रत्यक्ष काम करता येत नवते , सन १९८० ते २००१ पर्यंत अनेक अधिवेशने , मेळावे कार्यकारणी बैठकात उपस्थित राहिले, सन १९८९ साली पहिल्या कर्जमुक्तीसाठी मा. भास्करराव बोरवके माजी राज्य अध्यक्ष यांचे सोबत शेतकऱ्यांचे नादारीचे अर्ज भारावून अहमदनगर कोर्टात दाखल केले , त्यावेळी शेतकऱ्यांना १०००० रु. कर्जमाफी झाली होती . ३१/०३/२००१ रोजी स्वेच्छा निवृत्ती घेऊन दि. १ एप्रिल २००१ पासून शेतकरी संघटनेच पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सक्रिय झाले होते. दि. ३१ मे २००१रोजी येवला येथे सभेत आ. वामनराव चपट अध्यक्ष, शेतकरी संघटना व मा. रघुनाथ दादा पाटील, अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवृत्ती झाली. त्यानंतर संघटनेच्या वेगवेगळ्या पुकारलेल्या सर्व आंदोलनात महाराष्ट्र सर्वत्र सक्रिय सहभाग दिला . महाराष्ट्रातच नाहीतर संघटनेच्य पानिपत ( हरियाना ) या आंदोलनात , दिल्ली येथे , गुजरात येथे नर्मदा परिक्रमा अशा सर्व आंदोलनात सहभाग नोंदविला . त्यांचे काम पाहून जोशी साहेबांनी त्यांची निवड कोषाध्यक्ष व राज्य कार्यकारणीचे सदस्यपदी केली होती तसेच कर्जमुक्तीच्या आंदोलनात पूर्ण काम केल्याने त्यांची निवड मा. शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्र राज्य कृषी बँकिंग धोरण समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली . स्व. काळे साहेबांच्या उसावरील अभ्यासाचा विचार करून स्व. काळे साहेबांची महारष्ट्र राज्याची ऊस दर निश्चिती समितीवर राज्य पालांच्या सहीने निवृत्तीन करण्यात आली . पुढे रघुनाथ दादा यांच्या समवेत काम करताना ते त्यांचे अंतिम समय पर्यंत राज्याचे त्यांनी उपाध्यक्ष म्हणून संघटनेचे काम पहिले , कर्जमुक्तीची धोरण झाल्यानंतर सन २००८ शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले , त्यासाठी रिझर्व बँक, नाबार्ड , सहकार आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन गावगावी प्रचार केला . विजेसंबंधी कायद्याच अभ्यास करून ट्रान्सफार्म जाळीत प्रकरण व फार्म कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना एक महिन्यात कनेक्शन मिळण्यात पर्यंत केले.

साखर कारखान्याचे संबंधी ऊस उत्पादनासठी मेळावे घेऊन उसाच्या दरासंबंधी प्रबोधन केले , यासाठी साखर आयुक्त कृषी मंत्री व कृषिमूल्य व किंमत आयोगासोबत मुंबई येथे मा. रघुनाथ दादा पाटील यांचे सोबत बैठकीत उत्पादन खर्चाचे आकडे कसे चुकीचे काढले जातात हे पुराव्यासह आयोग्गाच्या अध्यक्षांना दाखवून दिले . त्याचाच परिणाम म्हणून अयोगाचे अध्यक्ष डॉ. टी हक यांनी दि. २७ मार्च २००८ रोजी पुरवणी अहवाल देऊन उसाची एम. आर. पी १५५० रु, प्रतिटन शिफारस केली . व शेतमालाच्या किमती ३५% वाढविण्यात आल्या . कृषीकिमत व आयोगाने दिल्लीत दि. ५/६/ ऑगस्ट २००८ रोजी झालेल्या बैठकीत आमंत्रण केले . तेथेही हा प्रश्न पोटतिडकीने मांडला . दि. १७/०२/२०१० रोजी पुन्हा दिल्लीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी सोबत बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते . तसेच उसाच्या प्रश्नसंबंधी राज्याचे राज्यपाल मा. एस.पी . जमीरसाहेब यांचेकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकारेसाहेब यांच्या सोबत चर्चा केलि. तसेच दि. १९/०२/२००९ रोजी मा. राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी कऱ्हाड येथे आमंत्रित करून त्यांच्याशीही उसाच्या प्रश्नासंबंधी चर्चा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत निवेदन दिले. बाजार समितीतील गैर्व्यावाहारासंबंधी पणन संचालक यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष्य वेधले . शेतमाल भावासामितीच्या पिक उत्पादन खर्चाची आकडेवारी कशी चुकीची आहे त्यामुळे खरी किंमत निघत नाही . व परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो म्हणून अनेक वर्षे कृषी मंत्रालयातील समिती कक्षाकडे पत्राव्याहार बैठकात घेऊन चर्चा केली .

कांदा ऊस आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीची बाजार समितीत होणारी लूट , वजनातील कसर म्हणून कपात करण्यात येणारी २ किलो कापती विरुध्द अनेक पत्र व्यवहार व प्रत्यक्ष आंदोलन केले. ऊस कांदा आंदोलनातील स्तानिक कोर्टात त्यांचे विरीधात अनेक केसी दाखल झाल्या होत्या , कांदा आंदोलनाचे रस्ता रोकोबद्दल श्रीरामपूर न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता . त्यात श्री काळे साहेबांसामावेत इतर ९ सहकार्यांना १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देखील झाली होती , बाजार समितीतील हमालीवर लेव्ही शेतकऱ्यांच्या शासनाच्या परिपत्रकाला कचरु कुऱ्हे व तुकाराम कुऱ्हे यांना पुढे करून ( बँकेत नोकरीस असल्यामुळे )औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्र . १३४०/१९२२ नुसार स्थगिती घेण्यात आली . व पुढे दि. १ जुलै २००५ ला अंतिम निकाल लागून शेतकऱ्यांच्या या जुलमी वसुलीपासून मुक्तता करण्यात यशस्वी झाले . पाटपाणी संघर्षाबाबत ( भंडारदरा ) क्षेत्रातील गोदावरी ऊजव्या कालव्याच्या ७ नंबर वरील फ़ोर्मवर पाण्यासाठी आंदोलन केले , त्यातही राहता येथील ९/४/२०१० रोजी केलेल्या साडेचार तास रस्ता रोको केल्याबद्दल केसेस दाखल झाल्या होत्या . तसेच मा. काळे साहेबांच्या कार्याची व शेतीविषयक अभ्यासाची दाखल घेत केंद्रशासनाने अखत्यारीत असलेल्या कृषिमूल्य आयोगामध्ये सदस्य म्हणून घेनेकारिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांची शासनाची वतीने शिफारस केली परंतु पुढे त्यांची नियुक्ती होणे पूर्वीच त्यांचा अपघात झाल्याने त्यांची नियुक्ती मागे पडली , तसेच स्व. काळे साहेबांची महाराष्ट्र शासन शेतीमाल नियंत्रण उपसमितीवर सदस्यपदी निवड झाली होती . त्याप्रमाणे या समितीच्या वेळोवेळी कृषीविद्यापीठामध्ये झालेल्या सर्व बैठकात उपस्थित राहून शेती मालाचा भाव काढण्याच्या प्रक्रियेत दोष दाखविल्याचा व त्यावर उपाय योजना सुचविल्या होत्या . अशा प्रकारे सातत्याने शेतकऱ्यासंबंधी परतेक प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने, सभा , घेराव आदि कामे केली आहेत . शेतकरी संघटनेचं प्रश्नावर जागृती व्हावी यासाठी सर्व स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्र करिता लेख लिहिले . बातम्या प्रसिद्ध करून लक्ष वेधत असत . त्यांचा शेतकरी चळवळीचा हा लढा सातत्याने दिवस रात्र सुरु होता व त्यांनी श्वास असे पर्यत चालू ठेवला .

श्रीरामपूर येथे २८/०४/२०१५ रोजी शरद पवार यांच्या होणार्या कार्यक्रमात निषेधाच्या आंदोलनाचे नियोजनाच्या कामात असताना दि. २७/०४/२०१२ रोजी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला . त्यानंतर त्यांचे बाहेर फिरणे बंद असताना देखील जागेवर बसून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे , लेख लिहिणे चालूच ठेवले अखेर दि . १५/०१/२०१५ रोजी त्यांना देवाज्ञा झाली .

मनोगत

"शोषित भूमिपुत्राच्या व्यथेचा बुलंद ज्वालामुखी " हे पुस्तक बबनरावजी काळे यांचे आयुष्यावर व त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. या पुस्तकाचे प्रकाशन यांच्या प्रथम स्मुती दिनाचे दिवशी करून त्यांना आदरांजली वाहने हि त्याच्या विचारांची चळवळ सुरु राहावी हा उद्देश आहे . स्व. काळे साहेबांच्या आयुष्याचा प्रवास , त्यांचे खडतर आयुष्य , आयुष्यात पावलोपावली आलेल्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेली मात , साहेबांनि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेले लिखाण , कामे हि जशीच्या तशी काळे साहेबांच्याच शब्दात ठेऊन नवीन पिढीला प्रेरानादाई ठरेल व त्यांच्या कामाच्या व कामातून त्यांना मिळालेली माहिती सामाज्यापुढे विशेष करून शेतकरी वर्गापुढे ठेवण्याचा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे . या पुस्तकाच्या माद्यमातून स्व. बबनरावजी काळे साहेब यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा त्यांच्यासोबत आयुष्याची काही वर्षे व्यथित केलेल्या त्यांच्या मित्र परिवार , सहकारी नातेवैकांच्या अनुभवातून बोलण्यातून व लिखाणातून आलेला सर्व काही मांडणे आवश्यक होते व हे सर्व अनुभव संग्रही ठेवाही असे आहे व तशी जाणीव झाल्याने हा पुस्तक प्रपंच मांडला . या पुस्तकाचे संकालानाकरिता काळे साहेबांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केलेली वर्तमान पत्रातील लेख , सरकारी निम सरकारी कार्यालयांना वेळोवेळी लिहिलेलं पत्रे , विविध सामाजिक कार्यात घेतलेले सक्रिय सहभाग , विविध विषयांवर शाळा , कॉलेज इतर मंचावरून संमेलनातून केलेले व्याख्य्याने या सर्वाचे संकलन करणे लोकांसमोर ठेवेने आवश्यक होते .

साहेबांनी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कागदपत्रांची एक खोली भरून असलेला कागद पत्रांचा संच व त्यातून मोजकीचे व ठराविक परंतु महत्वाची वाटणारी कागदपत्रे काढणे , त्यांचे जुने लेख , वर्तमान पत्रातील कात्रण , जुन्या आठवनीसाठी छायाचित्रे मिळवणे हे मोठे आव्हान होते . सर्वच कागदपत्रे महत्वाची असेल व पुस्तकरूपी मांडणी करतांना असलेला बंधनांचा व मर्यादेचा विचार करून हे सर्व एक पुस्तक करणे शक्य नाही स्व. बबनरावजी काळे साहेबांच्या नावाची एक वेबसाईट तयार करून या पुस्तकाच्या व्यातेरिक्त असलेली माहिती कागदपत्रे , प्रकाशित करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे www.babanraojikale.org हि वेबसाईट तयार केलेली असून त्यात शक्य होईल तितकी माहिती सुलभ पद्धतीने शोधत येईल अशी विषयांवर मांडणी केलेली आहे .

पुस्तक तयार करण्याचे ठरवले व तसे सर्वांना कळविले देखील त्यावेळी हे काम इतके कठीण असेल असे वाटले नव्हते . पुस्तक करण्याकरिता बघावे लागणारे बारकावे , याची त्यावेळी कल्पना नव्हती . पुस्तकांची निर्मिती करताना आलेले अनेक प्रश्न जसे पुस्तकाचा आकार किती असावा ? पुस्तकात काय लिखाण असावे ? पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ कसे असावे ? लेखकांचे लेख व त्यावर कमी अधिक प्रमाणात करावे लागणारे अनेक संस्कार , अगदी अक्षरांच्या आकारांपासून ते व्याकारानापर्यंत सर्व कामे , पुस्तकाकरिता स्व. बबनराव काळे यांचे आयुष्यातील घडामोडी , कार्य यास साजेसे होईल असे नाव ठरविले हे देखील फार मोठे आव्हान होते , परंतु हे सर्व माझे परीने पूर्ण करू शकलो ते केवळ आदरणीय भाऊंच्या आशिर्वादामुळेच .

स्व. बबनराव काळे यांचे जीवनावर व कार्यावर पुस्तिका तयार करणे बाबतची कल्पना ज्या वेळी मी मांडली त्यास सर्वांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. तर साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी तसे करण्याकरिता रेटा लावला. तशा अर्थाने हे पुस्तक माझे स्वत: चे प्रय्तन्याणे नाहीतर साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीतून, आग्रहातून साकारले आहे. हे पुस्तक करताना मला वारीस्थ्य लेखक साहित्यिक नामदेवराव देसाई काका, प्रा. डॉ. बबनरावजी आदिकसर , प्रा. डॉ. गोरख बारहातेसर, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये या सर्वयांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सदरच्या पुस्तिकेत ज्या मान्यवरांनी स्व. बबनराव काळे यांच्या विषयी लेख लिहून पाठवले आहेत ते लेख बहुतेकांचे पहिल्यांदाच लिखाण करणारे असे आहेत. त्यातील बहुतांश तर शेतकरी कुटुंबांतील आहेत. त्यांचे लिखाणात कादाचित साहित्य मूल्यांचा कमी अधिकपणा असेलही परंतु त्यांच्या त्या लिखाणात असलेल्या प्रामाणिक भावनांचा विचार करून ते सर्व लिखाण त्यांचे भाषेत, शैलीत मांडलेली आहेत. स्व. काळे साहेबांच्या प्रती असलेल्या प्रमातून व त्यांचे विषयीच्या असलेल्या भावना व्यक्त करण्या करिता अनेकांनी प्रत्यन केले त्यातील काही लेख वेळेत आल्याने त्यांच्या या पुस्तकात सामील करणे शक्य झाले. असे बरचसे लेख उशिराने आल्याने व वेळेची असलेली अडचण विचरात घेऊन बरेचशे लेख या पुस्तकात सहभागी करून घेणे शक्य झाले नाही. त्याबद्दल मी सर्व लेखकांची मनापासून क्षमा मागतो . या पुस्तक रुपी आपल्या सर्वांच्या भावना आदरणीय स्व. बबनरावजी काळे साहेबांच्या चरणी ठेवतो व त्यांनी केलेल्या कार्यातून उत्तराई होण्याच्या प्रयत्न करून त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली आपणा सर्वांच्या वतीने वाहतो.

- अॅड. अभिजीत बबनराव काळे.
  • स्व. बबनराव काळे यांच्या बद्दल
  • मनोगत
Contact Us
Our Location

पत्ता.

स्व. बबनरावजी काळे
c/o -अॅड. अभिजीत बबनराव काळे
" झुंज " सूर्यनगर , वार्ड नं . ७, श्रीरामपूर ,
ता. श्रीरामपूर, जिल्हा - अहमदनगर
राज्य - महाराष्ट्र

  • मोबाईल. ९८२२४४९२८८
    ९३२६४४९२८८
  • Email: abhijitbkale@gmail.com

Copyright © 2084 Your Company Name